
आज दिनांक ०७/१२/२०१६ रोजी दादोजी कोंडदेव सैनिक शाळा येथे तालुक्यातील उत्साही आणि तंत्रस्नेही शिक्षकांसाठी blogg निर्मितीची कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.तालुक्यातील जवळ पास 50 शिक्षकांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मणेराजुरी व चिंचणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आर.एस. कांबळे साहेब यांनी केले.त्यानंतर विस्ताराधिकारी madam डॉ.सौ.विमल माने यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.त्यानंतर जि प शाळा काळडोहवस्ती येथील तंत्रस्नेही शिक्षक श्री एस.एम.पतंगे यांनी हि कार्यशाळा चांगल्या रीतीने घेतली.
तसेच श्री आर.एस. कांबळे साहेब व डॉ.सौ.विमल माने madam यांनी दिवसभर उपस्थित राहून
कार्यक्रमाचे नियोजन व नियंत्रण केले.
शेवटच्या सत्रात या कार्यशाळेसाठी आग्रही असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी श्री पी.एम.कुडाळकर साहेब यांनी कार्यशाळेस भेट देऊन त्याबद्दल समाधान व्यक्त केले.तसेच त्यांच्या स्वभाव गुणानुसार चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून सर्वाना प्रोत्साहित,उद्बोधित केले.
आलेल्या प्रत्येक शिक्षकांचे blogg या कार्यशाळेत तयार झालेले होते हि खूप महतवाची आणि समाधानाची बाब ठरली,
पुढच्या कार्यशाळेच्या टप्प्याला येण्याचे ठरवून सर्व शिक्षकांनी कार्यशाळेची सांगता केली.





0 comments:
Post a Comment