क्षणचित्रे...

आकाशगंगा

आपली आकाशगंगा ही, सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या तारकासंघात आहे, त्या तारकासंघाचे (दीर्घिकेचे) नाव आहे. तिचे इंग्रजी नाव गॅलॅक्सी किंवा मिल्की वे अर्थात दुधट(दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह आपल्याला दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग नक्षत्र, नौका, वृश्चिक रास, धनु रास गरुड या ताऱ्यांमधून आपली आकाशगंगा पसरलेली आहे.

सूर्यमाला ही आकाशगंगेच्या मध्यापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे, तर सूर्य साधारण ३५००० प्रकाशवर्षे दूर आहे. सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी २५०० प्रकाशवर्षे आहे.
सूर्य, या आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलेटिक इयर म्हणून ओळखला जातो.
आकाशगंगा ही अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी(सुमारे ४० अब्ज) तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरूप, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी विलक्षण आहेत. आकाशगंगेचा व्यास एक लाख प्रकाशवर्षे आहे.

विश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असे आहे.

Share on Google Plus

About Sagar patange

0 comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();