क्षणचित्रे...

तासगांव प्रज्ञाशोध परिक्षेत सन २०१५-१६ मध्ये (TTS) 677 विद्यार्थ्यांनी मिळविलेले विशेष प्राविण्य


ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा शौक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंत
र्गत तासगांव पंचायत समितीने राबविलेला उपक्रम इ.1 ली, 2 री तासगांव प्रज्ञाशोध (TTS) स्पर्धा परिक्षेत इ.1 ली मध्ये परिक्षेस बसलेल्या एकूण 2191 विद्यार्थ्यांपैकी 1642 विद्यार्थ्यांनी तर 2 री मध्ये 2149 विद्यार्थ्यांपैकी 1835 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.90 पेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची 1 लीत 291 व 2 रीत 386अशीएकूण 677 विद्यार्थी संख्या आहे. 1 लीचा निकाल 74.94 % तर 2 री चा निकाल 85.39 % असल्याची माहिती सभापती सु­निताताई पाटील, उपसभापती अशोक घाईल, गटविकासअधिकारीसतीश गाकवे , गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकरयांनी दिली
हि परिक्षा  11 परिक्षा केंद्रावर 13 मार्च 2016 रोजी परिक्षा घेण्यात आली. त्यामध्ये तालुक्यात 1 लीत 100% ­निकालाच्या 28 तर 2 रीत 100% ­निकालाच्या 36 शाळा आहेत. केंद्रातील 1 ली व 2री चे मिळून विसापूर 108, कवठेएकंद 104, बोरगांवचे 98, येळावी 78, सावळज 76, मणेराजुरी 69, चिंचणी 48, मांजर्डे 36, अंजनी 24, नरसेवाडी 21, वायफळे 15 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळविलेले आहेत. 1 लीत 100गुण मिळविलेल्या जि.प. शाळा विसापूर नं. 2 चे 12 तर इ. 2 रीत 100 गुण मिळविलेल्या जि. प. शाळा बोरगांवचे 4 विद्यार्थी आहेत. या उपक्रमासाठी सर्व लोकप्रतिनिधी पंचायत समिती जि.प. सदस्य, गटविकासअधिकारी, शालेयपोषणअधिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक व सर्व संघटनाचे प्रतिनिधी, सर्व शिक्षा अभियान व पंचायत समितीतील विषयतज्ञ व कर्मचारी यांचेसहकार्य मिळत आहे,

खालील आलेखांच्या मदतीने तुम्हाला या उपक्रमाची यशस्विता लक्षात येईल...

इयत्ता 1 ली 












इयत्ता १ ली तील१०० ते ९५ गुण मिळविलेल्या गुणवंत  विद्यार्थ्यांची केंद्र व शाळा निहाय यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

इयत्ता-२ री













इयत्ता २ री तील१०० ते ९५ गुण मिळविलेल्या गुणवंत  विद्यार्थ्यांची केंद्र व शाळा निहाय यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Share on Google Plus

About Sagar patange

0 comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();