धुमकेतू अंतर्बाह्य अतिशय थंड व असुरक्षित असतो. त्याचे कवच सच्छिद्र असते व शीर्षस्थानी चॅाकलेटप्रमाणे थर असतात. धुमकेतूचा पृष्ठभाग स्फटिकासारखाआणि टणक असतो. मात्र, तो जेव्हा सूर्याच्या अतिनिकट येतो तेव्हा त्याचे हिमस्फटिकांत रूपांतर होते. त्यावेळी त्याची घनता अधिक असते. धुमकेतूचा पृष्ठभाग व अंतर्भाग मऊ असतो.
धूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग सौर अभ्रिकेपासून(Solar nebula) बनलेल्या घन कचर्यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतिथंड धूमकेतूच्या आतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर त्याच्यापासून उल्का होतात.
धूमकेतूचे आकारमान
धूमकेतूच्या शिराच्या मध्यभागी असलेल्या गाभ्याचा व्यास ५ ते १० कि.मी. असून त्याचे वस्तुमान १०१७ ते १०१८ ग्रॅम असते. पृथ्वीचे वस्तू १०२७ (एकावर २७ शून्य) आहे. म्हणजे धूमकेतूचे वस्तुमान प्रचंड असले तरी पृथ्वीच्या मानाने खूपच कमी आहे.
शीराचा गाभा इतका लहान असतो की जगातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीतूनही तो दिसू शकत नाही. असे असताना आपण धूमकेतू पाहतो म्हणजे काय पाहतो? आपण पाहतो तो प्रसारानं पावलेला कोमा होय. कधी कधी प्रसारानं पावलेला कोमा हा हजारो व्यासाच्या आकारमानाचा असतो. त्यातील धुलिकणांवर व इतर भागावर प्रकाश पडून तेथील प्रकाश किरण परावर्तित होतात व तो भाग चमकू लागतो, आपल्याला तेजस्वी दिसू लागतो. मंगळ, गुरू, शुक्र या ग्रहांप्रमाणे धूमकेतूसुद्धा सूर्यप्रकाशात चमकतात. धूमकेतू स्वयंप्रकाशी नाही.
धूमकेतूची शेपटी
धूमकेतूच्या शीराचा जो भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते. त्यामुळे एक प्रकारचा उर्त्सजन दाब निर्माण होत असतो. हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणार्या वायू व धुलिकणांना बाजूला सतत ढकलत असतो. ढकलल्या गेलेल्या द्रव्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो. सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही कोटी मैलही असू शकते.
सौजन्य-विकिपीडिया
0 comments:
Post a Comment